Friendship poem

एक कविता मैत्रीसाठी

       *मैत्री*

शब्दही न बोलता
अबोल साथ करते,
*ती मैत्री*.......
गवगवा न करता
एकलेपण मिटवते,
*ती मैत्री*.......
खूप व्याप असतानाही
आवर्जून आठवण काढते,
*ती मैत्री*........
हज्जार शब्द सांगत नाहीत
ते एका शब्दात कळवते,
*ती मैत्री*.......
उद्‍वेगल्या मनाला
शीतल शांतवते,
*ती मैत्री*.........
आपली चूक कबूल करून
मनात राग न धरता
परत पहिल्या सारखीच राहते
*ती मैत्री*......
आपल्यातलं आपलं माणूस
अचूक ओळखून
आपलेपणानं
आपलेपण जपते
*ती मैत्री*........
कितीही वादळं आली तरी
खंबीरपणाने
आपल्या सोबत राहते
*ती मैत्री*.........
स्त्री पुरुष हे सगळे बंध तोडून
निर्व्याजपणे
संगत करुन
साथ निभवते
*ती मैत्री*.........
अाणि वयाचं अंतर
न बाळगता
एकमेकांना समजू शकते
*ती मैत्री*........

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

School first day poem