Really nice poem read it

*ज्ञानपीठ विजेत्या लेखिका कै. महाश्वेता* *देवी यांची एक सुंदर* *कविता आणि कुणीतरी त्याचं केलेलं मराठीकरण ....*

*आलास..?*
*ये, दार उघडंच* *आहे ...आत ये*
*पण क्षणभर थांब....!!*

*दारातील पायपुसण्यावर*
*अहंकार झटकून ये...!!*

*भिंतीला बिलगून वर चढलेल्या*
*मधुमालतीच्या वेलावर*
*नाराजी सोडून ये...!!*

*तुळशीपाशी मनाचे सारे ताप सोडून ये...*
*बाहेरच्या खुंटीला सारे व्याप टांगून ये...!!*

*पायातल्या चपलांबरोबर*
*मनातली* *नकारात्मकताही काढून ठेव ..!!*

*बाहेर खेळणाऱ्या* *मुलांकडून*
*थोडा खेळकरपणा मागून आण..*
*गुलाबाच्या कुंडीतलं थोडं हसू*
*चेहेऱ्याला लावून आण...!!*

*ये...*
*तुझी सारी दुःखं, सारे प्रश्न*
*माझ्यावर सोपव...*
*तुझ्या दमल्या-भागल्या जीवाला*
*प्रेमाच्या चार गोड शब्दांचे विंझणवारे घालते...!!*

*ही बघ....*
*तुझ्यासाठीच ही* *संध्याकाळ अंथरली आहे मी..*
*सूर्य क्षितिजाला बांधलाय आणि*
*आकाशी गुलालाची उधळण केलीयं...*
*अन*
विश्वासाच्या मंदाग्नीवर*
*चहा उकळत ठेवलाय...*
*तो घोट घोट घे....*

*ऐक ना ...*
*इतकंही अवघड नाहीये रे जगणं ...!*

Comments

Popular posts from this blog

School first day poem

Friendship poem